पुरंदर ! अशोकभाऊ टेकवडे यांचे कार्य प्रेरणादायी-प्रा.दुर्गाडे
पुरंदर प्रतिनिधी-सिकंदर नदाफ पुरंदर हवेलीचे ख्यातनाम माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे याचे कार्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.
पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे अशोकभाऊ टेकवडे यांच्या ६२ व्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अशोकभाऊ टेकवडे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पुरंदर हवेलीसाठी केलेल्या विकासकामांचा आढावा सांगण्यात आला. तर पुरंदर हवेलीत रस्ते, ओढे, नाले, बंधारे तसेच विविध पाणी योजना व इतरही अनेक योजना टेकवडे यांच्या काळात झाल्या असल्या तरी देखील नंतर आलेल्यांनी मात्र त्यांचेच श्रेय लाटले असल्याचे प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे जेजुरी नगरपालिकेचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई वाघर चित्रपटाचे निर्माते राजेंद्र बरकडे माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे भारतीय पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे तालुका कार्याध्यक्ष गोरख मेमाणे कोषाध्यक्ष राजेंद्र जावळेकर सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे ज्येष्ठ नेते नारायण निगडे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव तसेच महेश राणे विजय थोपटे उत्तम धुमाळ सतिश साळुंखे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार संजय शेवाळे माधव बारभाई दादा मोरे संजय माने धालेवाडी गावचे सरपंच शरद काळाणे हनुमंत काळाणे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.