डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य काैतुकास्पद - उपविभागीय अभियंता बनकर एस. एम.
(दाैंड तालुका प्रतिनिधी सुभाष कदम)
दाैंड येथील उपविभागीय अभियंता खडकवासला पाटबंधारे उपविभाग क्रमांक १ च्या परिसरात स्वच्छता अभियान संपन्न डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड यांच्या साैजन्याने महाराष्ट्र भूषण आदरणीय डाॅ.तीर्थरूप श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पद्मश्री पुरस्कार सन्मानित,महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.दत्तात्रय नारायण तथा अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण डॉ.सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक १ मार्च २०२३ राेजी राज्यभर महास्वच्छता अभियानाचे आयाेजन करण्यात आले हाेते.
दाैंड येथील उपविभागीय अभियंता खडकवासला पाटबंधारे उपविभागाच्या परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. यावेळी दाैंड,कुरकुंभ,गार, तवगाव येथील श्री बैठकीतील १५२ श्री सदस्य सहभागी झाले हाेते.सदस्यांनी स्वच्छता अभियानासाठी लागणारे झाडू,फावडे,घमेली, कु-हाड,काेयता,तसेच १ जेसीबी,तीन ट्रक्टर च्या साह्याने सकाळी ७ ते १०:३० या कालावधीत २५ टन कच-याचे संकलन करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता अभियानामुळे पाटबंधारे विभागाचा परिसर स्वच्छ करण्यात आल्यामुळे खडकवासला पाटबंधारे उपविभाग क्रमांक १ दाैंडचे उपविभागीय अभियंता श्री.बनकर एस.एम.वरिष्ठ लिपीक आटाेळे पी.डी.कदम अमाेल अशाेक तसेच अधिकारी व पदाधिका-यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या निस्वार्थ कार्याचे काैतुक केले.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी स्वच्छता अभियान,रक्तदान शिबीर,वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन,विहीर पुन:र्भरण,शालेय विद्यार्थ्यांना शालेयसाहित्य व शालेय गणवेश वाटप असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात.