"सोमेश्वर" ला होळीचा सण मोठ्या उत्साहात
सोमेश्वरनगर- बारामती शहर आणि ग्रामीण भागात होळीचा सण मोठ्या उत्साहात व पारंपारिक पध्दतीने साजरा होत असतो सोमेश्वरनगर येथील चव्हाण कुटुंबियांच्या घरी घरगुती होळी सण साजरा करण्यात आला. हिंदू धर्म संस्कृतीमधील होळी हा शेवटचा सण असल्याने तो सर्वत्र मोठ्या उत्साहात व धामधुमीचा असतो. होळी पेटविण्याकरिता सर्वत्र बच्चे कंपनीची धावपळ पहायला मिळत होती. जळावू लाकडे, शेणाच्या गोवऱ्या यांची होळी सोमेश्वरनगर परिसरात जागोजागी बनविण्यात आली होती. ग्रामीण भागात गावांच्या मंदिरासमोर तसेच सामुहिक होळी पेटविण्यात आली तर शहरी भागात सोसायट्यांच्या बाहेर होळी पेटविण्यात आली. महिलांनी होळीला पारंपारिक पध्दतीने बनविलेला पोळ्याचा नैवेद्य दाखवत पूजन केले.