सोमेश्वरचे १२ लाख गाळप पूर्ण - पुरुषोत्तम जगताप
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १२ लाख ११ हजार मेट्रीक टनाचे गाळप पूर्ण केले असून सरासरी ११.६१ टक्के साखर उतारा राखत १४ लाख ३ हजार साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत कारखान्याच्या कोजन प्रकल्पातून ७ कोटी ९९ लाख ७ हजार ६७३ युनिटची वीजनिर्मिती केली असून ४ कोटी ३१ लाख ९७ हजार २१ युनिटची वीजविक्री केली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पातून ६७ लाख ५३ हजार ५१३ लिटर अल्कोहोल उत्पादन घेतले असून सोबत ३२ लाख २० हजार ५९२ लिटरचे इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे अशी माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कारखान्याकडे सभासदांचा व बिगर सभासदांचा नोंदलेला संपूर्ण ऊस तुटल्याशिवाय कारखान्याचा गाळप हंगाप बंद होणार नाही त्यामुळे सभासदांनी निश्चित राहावे असे आवाहन श्री.जगताप यांनी केले आहे.जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याच्या येत्या गाळप हंगामाकरता जाहीर झालेल्या लागण प्रोग्रॅममध्ये मुदतवाढ देण्यात आली असून यामध्ये ८६०३२, ८००५, १०००१, २६५,या जातीच्या रोप लागवडीस परवानगी देण्यात आली असुन ही परवानगी मार्च अखेर पर्यंत सुरू राहणार आहे. तरी सर्व सभासदांनी याचा लाभ घ्यावा असेही जगताप म्हणाले.
जगताप पुढे म्हणाले की, आगामी काळातील ऊसतोड मजुरांची घटणारी संख्या पाहता आपला सोमेश्वर कारखाना सभासदांना ऊसतोड करण्यासाठी हार्वेस्टर खरेदीसाठी कारखान्यामार्फत बिनव्याजी कर्ज योजना राबविण्याचा विचार आहे. याबाबत इच्छुक सभासदांनी शेतकी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री.जगताप यांनी केले आहे.
जगताप पुढे म्हणाले की, पुढील हंगामात मार्चच्या पुढे तुटणार्या ऊसाला अनुदान देण्याचा संचालक मंडळ विचार करीत असुन सभासद बांधवांनी खोडवा पिक राखावे व याचा लाभ घ्यावा.