बारामती ! महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये"मराठी राजभाषा दिन"संपन्न.
बारामती - बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये (सोमवार दि.२७)रोजी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास ताराचंद नारायण आवळे माणदेशी साहित्यिक प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. तसेच राहुल निकम वन अधिकारी हे देखील पाहुणे म्हणून लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
आपल मनोगत व्यक्त करताना आवळे सर म्हणाले, की उत्तम संस्कार देऊन देशाचे सुजाण नागरिक ही शाळा नक्कीच घडवेल व उत्तम संस्कार असलेले कर्तृत्ववान व्यक्ती नक्कीच इथे घडतील ,इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी शाळेचा उपक्रम स्तुत्य आहे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. शिवाय आपल्या लेखनाचे समृद्ध अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच स्वलिखित पुस्तके माननीय प्रमुख पाहुण्यांनी शाळेस भेट म्हणून माननीय मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केली.
सदर कार्यक्रमामध्ये इयत्ता पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले . त्यामध्ये मराठी संत, स्वातंत्र्यसेनानी,खेळाडू यांच्या भूमिका, मराठी पोवाडा,महाराष्ट्राचे राज्य गीत, नृत्य तसेच नाटक असे विविध कलाप्रकार सादर केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. व सर्व शिक्षकांनी नेमून दिलेली कामे व्यवस्थित पार पाडली.
अशाप्रकारे मराठी राजभाषा दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.