चौधरवाडी येथे "एअरटेल टॉवर" चा लोकार्पण सोहळा संपन्न.
एअरटेल कंपनीतर्फे स्वतःचा 5G/4G नेटवर्क टॉवर.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील चौधरवाडीगावठाण भापकर मळा,दगडेवस्ती, चौधरीदरा सोमेश्वर मंदीर माळेवाडी जोशी वाडी,रासकरमळा.गायकवाड वस्ती,मगरवाडी,नाईकवाडी,मोरेवाडी,खोमणेवस्ती यासर्वपंचक्रोशीतील सर्व नागरिकांना कळविण्यात आनंद वाटतो कि चौधरवाडी या ठिकाणी एअरटेलकंपनीतर्फे स्वतःचा 5G/4G नेटवर्कटॉवर दि.१ मार्च २०२३ बुधवार रोजी करंजेपुल दुरक्षेत्र चे
पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार यांचे शुभ हस्ते हा एअरटेल टॉवर चा लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी एअरटेल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी हेमंत श्रीवास्तव , उमा शंकर तसेच सोमेश्वर भागातील
एअरटेल कंपनीचे मुख्य डिस्ट्रीब्यूटर राकेश पवार
चौधरवाडी गावाचे पोलीस पाटील व एअरटेल कंपनीचे स्थानिक विक्रेते राजकुमार शिंदे
तसेच माजी उपसरपंच तानाजी भापकर, चेअरमन शशांक पवार, पोलीस कर्मचारी अमोल भोसले, साळुंंके मेजर , नितीन गायकवाड सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन एअरटेल टॉवरचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या प्रसंगी एअरटेल कंपनीतर्फे सर्व ग्राहकानी आपला इतर कंपन्यांमधील नम्बर एयरटेल मधे पोर्ट करुन महिन्याचा बॅलन्स मोफत देण्यात आला तर या योजनेचा जास्तीतजास्त लोकांनी फायदा घेत.
कंपनीमार्फत ग्राहकांसाठी उत्कृष्ट नेटवर्कची सेवा उपलब्ध करून दिली आहे.