करंजे येथे "सोमेश्वर महाराज" सोमवती पालखी सोहळा ढोल ताशांच्या गजरात संपन्न...!
ननवरे कुटुंबीयांकडून महाराज पालखीसोहळ्यास पायघड्यांंचे आयोजन...
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ प्रतिरूप मानले जाणारे श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर,करंजे आहे सोमेश्वर करंजे येथे शिवभक्त विविध जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येत दर्शनासाठी येत असतात.
सोमवती आमावस्या निमित्त सोमेश्वर महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा दि २० रोजी करण्यात आला सोमवारी सोमवती अमावस्या आल्या निमित्त सोमेश्वर महाराजांची मूर्तीपालखी सोहळा सोमेश्वर मंदिर करंजे येथून निरा स्नान उपस्थित मानकरी व पुज्यारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत जात असते.... खांदेकरी मानकरी व पुजारी वर्ग यांच्या उपस्थितीत प्रस्थान झाले दुपारी बारा वाजता मूर्ती निरा स्नान होत निबुत , करंजेपुल मार्गे संध्याकाळी करंजे गाव येथे दाखल होते...या सोहळ्यानिमित्त श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते....दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्त आस्वाद घेत असतात ... सायंकाळची सोमेश्वर मूर्ती महाराजांची आरती पुजारी,ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली...पारंपरिक वाद्य 'डोल ताश्याच्या गजरात ...पालखी प्रस्थान केली मुख्य पेठेतून पालखी मिरवणूक निघत ....या पालखी सोहळ्यानिमित्त सडा रांगोळी तसेच राजेंद्र ननवरे (करंजे) यांच्या मार्फत श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तसेच महाशिवरात्र व सोमवती अमावस्या निमित्त महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पायघड्याळाचे आयोजन असते यावेळी ननवरे कुटुंब व मित्र परिवार उपस्थित होते...