मुढाळेत शिवजयंती जल्लोषात साजरी
मुढाळे - बारामती तालुक्यातील मुढाळे येथे 'एक गाव एक शिवजयंती' या उक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मुढाळे गाव व वाडीवस्ती परिसरातील सर्व तरुणांनी गावातील गट तट सोडून, गावातील सर्वच समाजघटक एकत्र करत सर्वांनी एक गाव एक शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले. या विचाराने गावातील तरुण एकत्र येत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शनिवारी दि.१८ सिंहगड येथे शिवज्योत आणण्यासाठी प्रस्थान करण्यात आले. रविवारी दि.१९ दुपारी गावच्या वेशीवर शिवज्योतीचं वाजात गाजत स्वागत करण्यात आले. सायंकाळी महाराजांच्या प्रतिमा पूजन व पाळणा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी लहान मुलांची भाषणे झाली. सोमवारी दि.२० श्रींची शाही मिरवणूक काढण्यात आली. मर्दानी खेळ, झांज पथक, अश्व पथक, लेजर लाईट शो, हलगी वादन ग्रुप, लेझिम पथक यांनी डोळ्याचे अगदी पारणे फेडले. यावेळी जवळपास ३००० हजाराहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता. समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवस झालेल्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सार्वजानिक शिवजयंती उत्सव समितीने केले होते.