बारामती ! पिंपळीत त्यागमूर्ती रमाई जयंती उत्साहात साजरी
बारामती:पिंपळी-लिमटेक येथील महिलांनी एकत्रित येत रमाई जयंती भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह पिंपळी याठिकाणी साजरी केली.
ग्रामपंचायत सदस्या अश्विनी सुनिल बनसोडे यांच्या पुढाकाराने पिंपळी गावात प्रथमच रमाई जयंती साजरी करण्यात आली.
अत्यंत हलाखीची व गरिबीची परिस्थिती सहन करत रमाबाईंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कौटुंबिक साथ देऊन एक प्रकारे ह्या समाजकार्य व बाबासाहेबांच्या देश कार्यास त्यांनी अप्रत्यक्ष सहभागी होऊन प्रत्यक्षात प्रचंड त्याग व हाल अपेष्टा मोठया धैर्याने सोसल्या व बाबासाहेबांच्या संसाराची जबाबदारी पार पाडली.त्यांचे या त्यागाने व शांत वृत्तीने बाबासाहेबांना शिक्षण घेण्यात व ज्ञान घेण्यात शक्ती मिळत असे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीर स्त्री उभी असते. याप्रमाणे रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीमागे त्यांना प्रेरणा देत एखाद्या दीपस्तंभासारख्या उभा राहिल्या एवढ्या मोठ्या महामानवाची पत्नी म्हणून त्यांच्या त्याग आणि हाल अपेष्ठांची किंमत होऊ शकत नाही. ते अनमोल असेल असे प्रस्ताविकात मनोगत ग्रामपंचायत सदस्या अश्विनी बनसोडे यांनी व्यक्त केले.
उपस्थित सर्वांचे स्वागत सावित्री प्रशिक्षण संस्थेच्या सचिव ज्योत्स्ना गायकवाड यांनी केले तसेच सूत्रसंचालन सावित्री प्रशिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा पूनम थोरात यांनी केले तर आभार प्रसन्ना थोरात यांनी मानले मानले.
यावेळी पिंपळी-लिमटेक येथील महिला व युवती बहुसंख्येने उपस्थित होत्या.