Type Here to Get Search Results !

दलित पॅंथर संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण काकडे तर बारामती तालुका अध्यक्षपदी अशोक भोसले यांची निवड.

दलित पॅंथर संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी लक्ष्मण काकडे तर बारामती तालुका अध्यक्षपदी अशोक भोसले यांची निवड.
----शंतनु साळवे----
दलित पँथर संघटनेची पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक पुणे स्टेशन येथे घेण्यात आली. या बैठकीत सातारा जिल्हा अध्यक्ष पदी फलटणचे रहिवासी लक्ष्मण काकडे यांची फेरनिवड करण्यात आली. तर बारामती तालुका अध्यक्ष पदी सावळ येथील अशोक भोसले, महीला आघाडी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी वंदना भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.  निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष घनश्याम भोसले यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष विश्वास मोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद लोखंडे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अर्जुन शिंगे, पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश आवाडे व जिल्हा व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test