महाशिवरात्री उत्सवानिमित्त जळोची येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
बारामती : महाशिवरात्री उत्सवानिमित्त जळोची येथिल श्री महाकाळेश्वर मंदीर या ठिकाणी जळोची परिसरातील 350 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करुन औषध वाटप करण्यात आली.
शिबीरात रुग्णांची मोफत तपासणी बारामती उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ.सदानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ.महेंद्र आटपलकर, डाॅ.राहूल आगवणे यांनी सहकार्य केले.
शिबीराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते,स्वप्निल कांबळे,नंदु वाईकर,माजी नगरसेवक शैलेश बगाडे,महेंद्र गोरे,जब्बार शेख यांनी केले होते.जळोची परिसरातील ग्रामस्थांनी शिबिराला चांगला प्रतिसाद देत मोफत औषध वाटप व आरोग्य तपासणी करुन लाभ घेतला.
यावेळी प्रताप पागळे,अँड.अमोल सातकर,माधव मलगुंडे,नवनाथ मलगुंडे,दत्तात्रय माने,धनंजय जमदाडे,प्रमोद ढवाण,अमोल पिसाळ,दत्तात्रय गोसावी,दादा शिरसट तसेच जळोची भैरवनाथ यात्रा कमिटीचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.