"महाशिवरात्री" यात्रा उत्सव साठी सोमेश्वर देवस्थान सज्ज..!
सोमेश्वरनगर - श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर करंजे (ता. बारामती) येथील प्रतिसोरटी सोमनाथ म्हणून प्रसिद्ध सोमेश्वर मंदिर येथे शनिवार (दि.१८) महाशिवरात्रीनिमित्त स्वयंभू सोमेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी होत असते राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी हरहर महादेवाच्या गजरात सोमेश्वराचे दर्शन घेत असतात,महाशिरात्री निमित्त सोमवार दि १३ पासून मंदिर परिसरात अतिरुद्र अनुष्ठान चे आयोजन श्री सोमेश्वर कारखाना मार्फत केले असून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सांगता होत असते या अनुषंगाने भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हाहन देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले असून देवस्थान वतीने भाविकांसाठी महाप्रसाद, खिचडी, फळे, दूध,चहा, पिण्याचे पाणी सोय केली असून मंदिर परिसरात मोफत पार्किंगची सोय करण्यात आली आहे. . होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांसाठी मोफत औषधोपचारांची सोय करण्यात आली आहे तसेच वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहायक पोलिस सचिन काळे व करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवन्यात आला आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसर विविध प्रकारची खेळणी, मिठाईची दुकाने, प्रसादाची दुकाने, हॉटेल,
पाळणे आदींनी परिसर दुकाने सजवण्यास सुरुवात झाली आहे दुकानांमुळे मंदिर परिसर गजबजून जाणार आहे.
येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद,दर्शन व्यवस्था, प्रशस्थ मोफत पार्किंग, पाणी व रहाण्यासाठी भक्त निवास उपलब्ध केला आहे,जगभरातील शिवभक्तांनी सोमेश्वर दर्शनाचा लाभ घ्यावा.
देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष - प्रताप भांडवलकर
महाशिरात्री यात्रा वेळी मंदिर व परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस बंदोबस्त चोक ठेवलेला आहे.
ए.पी.आय :- सचिन काळे