महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये"आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन" उत्साहात साजरा
बारामती प्रतिनिधी
बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संग्राम चव्हाण
(Scientist,ICAR NATIONAL Institute of of Abiotic Stress management Baramati)आणि डॉ. प्रतापसिंह खपटे (Scientist,ICAR NATIONAL Institute of of Abiotic Stress management Baramati) लाभले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
आपल मनोगत व्यक्त करताना डॉ.संग्राम चव्हाण सर आणि डॉ.प्रतापसिंह खपटे सरांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले तसेच भविष्यात विद्यार्थ्यांसाठी खुल्या असलेल्या विज्ञानातील विविध विभागांची माहिती दिली. शेती विज्ञान याविषयीही सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमामध्ये पूर्व प्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिकृती, तक्ते आणि प्रयोगांचे सादरीकरण अत्यंत सुंदर पद्धतीने केले. काही विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित कविता सादर केल्या तर काहींनी भारतीय वैज्ञानिकांची माहिती सांगितली.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका. सोनाली क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षकांनी नेमून दिलेली कामे व्यवस्थित पार पाडली.
अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.