वडगांव निंबाळकर येथील मुलींनी महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल 'आजी माजी सैनिक संघ' वतीने सत्कार.
सोमेश्वरनगर - क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे ,महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरिय शालेय मैदानी स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी, पुणे या ठिकाणी पार पडला, या स्पर्धेत बारामती तालुक्यातील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर मधील विद्यार्थ्यांनी 4 × 400 मीटर धावणे रिले स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली असून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला व नॅशनल साठी त्यांची निवड झाली... सदर संघातील खेळाडू
कु. शिवानी गोपीचंद जाधव
कु. ऐश्वर्या अनिल यादव
कु. अनिता लालासो ठोंबरे
कु. संध्या लालासो ठोंबरे
कु. प्रगती चंद्रकांत दरेकर
या विद्यार्थिनींचे आणि मार्गदर्शक शिक्षक. निलेश दरेकर होते तर आजी माजी सैनिक संघटना मुख्य शाखा सोमेश्वरनगर येथे रविवार दि २६ रोजी संघटना संस्थापक अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते सत्कार कार्यक्रम संघटना कार्यालय येथे ठेवण्यात आला होता .
संघटना कार्यालयात यावेळी बचत गट मीटिंग ही घेण्यात आली.यावेळी आजी माजी सैनिक संघटना संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ लकडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित मिटींग रविवार दि २६ रोजी सोमेश्वरनगर येथील संघटना कार्यालय येथे संपन्न झाली झाली.
यावेळी अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर , कार्याध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,सचिव पंकज कारंडे,सल्लागार राजाराम शेंडकर , सदस्य युवराज चव्हाण ,गणेश शेंडकर. संघटनेचे सहखजिनदार रवींद्र कोरडे. स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसाहेब लकडे. तसेच सोमेश्वर सहकारी कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड, माजी उपसरपंच निलेश गायकवाड उपस्थित होते.