पुरंदर उपसा योजनेस ... इतक्या रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता
बारामती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेना उपनेते विजय शिवतारे माजी राज्यमंत्री यांनी केलेल्या मागणीनुसार पुणे जिल्ह्यातील बारामती,पुरंदर, हवेली, दौंड,आदी तालुक्यातील शेती सिंचनासाठी वरदान ठरलेल्या महत्त्वाच्या पुरंदर उपसा योजनेस ४६० कोटी रुपयांची पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता आज कॅबिनेट मंत्रिमंडळाने दिली.याबाबतची माहिती माजी मंत्री शिवसेना उपनेते विजय शिवतारे यांनी दिली.
सतत दुष्काळी तालुका असलेल्या पुरंदर तालुक्याला पुरंदर उपसा योजना जीवनदायी ठरली आहे.या योजनेतून चार तालुक्यातील ६३ गावात २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने या योजनेचा फायदा झाला आहे.या योजनेतील ३८३ कोटी रुपये आज अखेर पर्यंत सिंचन योजनेवर खर्च झाले असून पाईपलाईन, दुरुस्त्या व अन्य कामांसाठी हा नवीन निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती माजीमंत्री शिवसेना उपनेते विजय शिवतारे यांनी दिली.