सोमेश्वरनगर ! मु सा काकडे महाविद्यालयात मोफत हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य शिबिर संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे मुकुटराव साहेबराव काकडे कॉलेजमध्ये महाविद्यालय व्यवस्थापन आणि मेडिसिटी मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये महिला स्टाफ साठी व विद्यार्थिनींसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य शिबिर शनिवार दि ४ रोजी आयोजित केले होते यासाठी बारामती मधील सु प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ मोनाली राहुल जाधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास वायदंडे उपस्थित होते, सदर आरोग्य शिबिरासाठी सुप्रिया निकम, सुजाता भोईटे, जया कदम, बिभीषण निकम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
डॉ मोनाली जाधव व डॉ राहुल जाधव बारामती मध्ये आरोग्य हॉस्पिटल येथे कार्यरत असतात तसेच समाज उपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा नियमित सहभाग असतो.