शेतकऱ्यांची परंपरा जपली ....अन् चक्क बैलगाडीतून निघाली नवरीबाईची वरात
शेतकऱ्यांची परंपरा जपली ....अन् चक्क बैलगाडीतून निघाली नवरीबाईची वरात ,जुन्या आठवणींना उजाळा. ..पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वर मधील करंजेपुल-गायकवाड वस्ती येथे नुकताच एक विवाह सोहळा निमित्त गोविंद(रमेश) गायकवाड यांची मुलगी निकिता हिच्या लग्नाची वरात पारंपरिक पध्दतीने काढली . आजकाल महागड्या आलिशान चारचाकी,DJ,ऑर्केस्ट्रा लाऊन एवढंच काय हेलिकॉप्टर ने सुध्दा हौशी वऱ्हाडी वधूला घेवून जात आहेत या झगमगत्या व अत्याधुनिक युगात वऱ्हाड चक्क सजवलेल्या बैलगाडीतून वरात निघाली. बारामती तालुक्या सह सोमेश्वर पंचक्रोशीत हा विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरला. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रमेश गायकवाड यांची कन्या निकिता व प्रल्हाद धुमाळ यांचे चिरंजीव निखिल यांचा विवाह सोहळा असल्याने गोविंद(रमेश) गायकवाड यांची मुलगी निकिता ची विवाहदिनी सकाळी वरात पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीतून असल्याने ती दिमाखदार दिसत होती . जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने सोमेश्वर पंचक्रोशीत गायकवाड कुटूंबाचे परिसरातून कौतुक होत आहे.