मराठी गौरव दिनी ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांना अभिवादन
बारामती : महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त राज्यात मराठी गौरव दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात कवि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह उप विभागीय व तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.