तो अपंग असूनही त्याने बॉडी बिल्डर स्पर्धेत ४ था क्रमांक पटकावला.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील प्रीतम जाधव चा अपंग गटातून शरीरसौष्ठव स्पर्धेत पुणे श्री मध्ये चौथा क्रमाक पटकावला ही स्पर्धा दि. २४ रोजी बिबेवाडी पुणे येथे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन मान्यतेने आयोजीत बॉडी बिल्डर्स स्पर्धेमध्ये २०० ते २५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .यामध्ये अपंग ( Handicap) गटातून ७० ते ८० स्पर्धक होते .यामधून वडगाव निंबाळकर मधील प्रीतम राजेंद्र जाधव याणे या बॉडी बिल्डर या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच सहभाग घेतला होता. तो दोन्ही पायांनी अपंग असून त्याने या बॉडी बिल्डर स्पर्धेमध्ये पुणे श्री चा ४ था क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या प्रामाणिक व्यायाम व जिद्द चिकाटीने प्रीतम हा व्यायाम करत असे .
त्याने बॉडी बिल्डर्स क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच पाऊल टाकून त्याने त्याच्या या प्रयत्नांना यश मिळवले आहे. प्रीतम यांच्याशी संभाषण करताना ते असे म्हणाले की या पाठीमागे त्यांचे वडील राजेंद्र जाधव व आई कविता जाधव व भाऊ तन्मय जाधव यांचे सदैव ते माझ्या प्रयत्नाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांनी मला योग्य प्रशिक्षण व प्रतिसाद दिला आहे. प्रीतम हा दोन्ही पायांनी अपंग असून त्याची ही जिद्द व चिकाटी पाहून त्यांचे घरच्यांचे देखील मन भरुन आले व त्याचे घरचे त्याला प्रत्येक गोष्टीला त्यांचा पाठिंबा असतो त्यांचे आई-वडील हे प्रितमला सदैव सांगत असतात की तू अपंग असला तरी तुझ्यात काही ना काही करण्याची जिद्द आहे .आई-वडिलांच्या पाठिंब्याने व प्रोत्साहाने प्रीतम त्याच्या ध्येयाला आज यश मिळाले आहे. प्रीतम हा रोज वडगाव निंबाळकर जाणता राजा प्रतिष्ठान तालीम येथे व्यायाम करत असे व तेथील त्यांचे सहकारी मित्रांचे सहकार्य देखील त्याला लाभले.
प्रितम हा अपंग असून त्याने अपंग गटातून पहिल्यांदा सहभाग घेऊन ४ था क्रमांक मिळवला याबद्दल वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत , ग्रामस्थ व जाणता राजा प्रतिष्ठान यांच्याकडून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.