उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाघळवाडी यांचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाघळवाडी यांचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत प्रथम क्रमांक पुणे जिल्हा परिषद, पुणे शिक्षण विभाग, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ व एमआयटी लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९,१० व ११फेब्रुवारी २०२३ रोजी MIT लोणी काळभोर येथे पार पडलेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कर्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेने सादर केलेल्या इनसिनीरेटर या प्रकल्पास इयत्ता ९वी ते १२ वी या गटात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच सदर विद्यार्थ्यांची विभागीय विज्ञान प्रदर्शनास निवड झाली.सदर प्रकल्प तयारीमध्ये विद्यार्थिनींनी चांगली तयारी केली होती.
या प्रकल्पास प्राचार्या रोहिणी सावंत तसेच आश्रमशाळेतील विज्ञान शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन झाले. विज्ञान प्रदर्शनातील यशासाठी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य हनुमंतराव सावंत यांनी सर्वांचे अभिनंदन केले.