युवा सामाजिक कार्यकर्ते संजय बोरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा
बारामती : गुणवडी-बांदलवाडी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस अनाठायी खर्च टाळून बांदलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरजवंत विध्यार्थी व विद्यार्थिनींना चांगल्या प्रतीच्या स्कूल बॅग, पाणी बॉटल ,वह्या व पेन असे शालेय साहित्याचे मोफत वाटप करून करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वाढदिवस अभिष्टचिंतन गीत गाऊन शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला. त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पहाण्यासारखा होता.
उपस्थित मान्यवरांनी देखील त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व असेच होतकरू तरुण-युवकांनी बॅनरबाजी यावर खर्च न करता सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करावा असे मनोगत प्रा.इंगळे सरांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे,पिंपळी गाव पोलीस पाटील मोहन बनकर,प्रा.सुरेश बोरकर,प्रा.इंगळे सर,अनिल वाईकर, शैलेश थोरात,विकास देवकाते, सुनिल सोमनाथ वाईकर, कृष्णा लाड, सौरभ वाईकर,अनिल बिरदवडे, बादशहाभाई शेख, विकास यादव ,सुरेश वाईकर,अजिंक्य बांदल, संतोष आवाळे, अमर बोरकर,बाळा इंगळे आदींसह युवक,प्रमुख पदाधिकारी,शिक्षक विध्यार्थी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
शुभेच्छा मनोगत सुनिल बनसोडे, शैलेश थोरात,सुरेश बोरकर यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास सहकार्य सुनिल सोमनाथ वाईकर यांचे लाभले. सूत्रसंचालन अनिल वाईकर यांनी व आभार विकास देवकाते यांनी मानले.