बारामती ! तालुका रोपवाटिकेत फळपिकाची कलमे विक्रीसाठी उपलब्ध
बारामती : कन्हेरी येथील तालुका रोपवाटिकेत विविध प्रकारच्या फळपिकाची कलमे शासकीय दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे.
रोपवाटिकेच्या प्रक्षेत्रावर आंबा फळपिकाच्या केशर, हापूस, वनराज, तोतापुरी, चौसा, क्रोटॉन, सुवर्णा, पुसा अरुनिमा, दूधपेढा, रत्ना, मलिका, नीलम, गोवा मानकूर, टॉम अँटकिंग, केंट सिंग्टन, डाळिंब फळपिकाचे भगवा व सुपर भगवा या वाणासह पेरू, चिक्कू, नारळ, शेवगा, अंजीर, व कागदी लिंबू यांचीही कलमे शासकीय दराने विक्रीकरीता उपलब्ध आहेत.
आंबा ८० रूपये, डाळिंब ३० रूपये, पेरू ६० रूपये, चिक्कू ९० रूपये, नारळ २०० रूपये, शेवगा २५ रूपये, अंजीर ४० रूपये व कागदी लिंबू ३५ रूपये असे प्रती नगाचे दर आहेत.
अधिक माहितीसाठी कृषि पर्यवेक्षक प्रतापसिंह शिंदे (भ्रणध्वनी ९८२२२७१९२५), कृषि सहायक कुलभूषण लोणकर (भ्रणध्वनी ९७६७५३५३६५), लिपिक अभिजित शेंडे (भ्रणध्वनी ९८६०७७१००७) यांच्याशी संपर्क साधून शासकीय दराने कलमे खरेदी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.