Type Here to Get Search Results !

प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे राज्यातील पहिला " अ " मानांकन पत्र प्रदान सोहळा संपन्न..!

 प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे राज्यातील पहिला " अ " मानांकन पत्र प्रदान सोहळा संपन्न..!
पुणे - " अ " मानांकन मिळविण्यात मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अव्वल स्थानी पुणे शहरातील मोटार ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण संस्थांची तपासणी करून " "अ " दर्जा गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या एकूण 36 सरकार मान्य ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना मानांकन पत्र प्रदान सोहळा प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे पार पडला संपूर्ण महाराष्ट्रात परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार तपासणी पूर्ण करून मानांकन पूर्ण करून हे मानांकन प्रदान करणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय पुणे हे राज्यातील प्रथम कार्यालय ठरले आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी डॉ अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत भोसले सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले
मोटार ड्रायव्हिंग स्कूल  ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याशी संलग्न असलेल्या पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी " अ  " मानांकनात अव्वल स्थान पटकावले 100 वर्षापेक्षा जास्त काळ सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रात चौथी पिढी कार्यरत असलेले आपटे मोटार स्कूल अलका टॉकीज पुणे संचालक विलास आपटे हे असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत कुंभार मोटार ड्रायव्हिंग स्कूल नवी पेठ पुणे चे संचालक यशवंत कुंभार हे असोसिएशनचे महासचिव आहेत तसेच न्यू विनायक मोटर ड्रायव्हिंग स्कूल कोथरूड पुणे संचालक राजू घाटोळे मोटार ड्रायव्हिंग स्कूल तसेच महाराष्ट्र राज्याचे ते अध्यक्ष आहेत तसेच राजू घाटोळे यांच्या वडिलांचे विनायक ड्रायव्हिंग स्कूल सहकार नगर पुणे 9 संचालक कुंडलिक  मारुती घाटोळे यांचा 72 वर्षाचा प्रशिक्षक म्हणून अनुभव आहे ते 1971 रोजी पुण्यातील डबल डेकर बस शिकवणारे पहिले प्रशिक्षक आहेत त्यांच्या प्रशिक्षण संस्थेला सुद्धा अमानांक मिळाले आहे
मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओ नर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष व श्री उदय मोटार ड्रायव्हिंग स्कूल लेक टाऊन कात्रज पुणे संचालक एडवोकेट निलेश गांगुर्डे यांच्याही प्रशिक्षण संस्थेचा समावेश अमानांकनात आहे
मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष व श्री व्यंकटेश्वरा मोटार ड्रायव्हिंग स्कूल साने गुरुजी स्मारक पुणे संचालक अनंत कुंभार यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ  मानांकन प्राप्त झाले आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व लॉर्ड रामा मोटार ड्रायव्हिंग स्कूल निरा जेजुरी संचालक भाऊसाहेब कुदळे यांच्या प्रशिक्षण संस्थेला अमानांक प्राप्त झाले आहे तसेच पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहराचे महासचिव व नितीन मोटार ड्रायव्हिंग स्कूल एकलव्य कॉलेज कोथरूड पुणे या प्रशिक्षण संस्थेचे संचालक नितीन भांबुरे यांच्याही प्रशिक्षण संस्थेला अ  मानांकन प्राप्त झाले आहे.
क्लासिक मोटर ड्रायव्हिंग स्कूल एन आय बी एम रोड कोंढवा संचालक व मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स   महाराष्ट्र राज्य  राज्य सचिव संजय सोनवणे यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त झाले आहे.
भूमाता ब्रिगेड च्या सचिव व रामलिंग मोटार ड्रायव्हिंग स्कूल शिरूर पुणे च्या संचालिका पुष्पक केवडकर यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ  मानांकन प्राप्त झाले आहे.
पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे कात्रज विभागाचे अध्यक्ष व स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूल कात्रज पुणे संचालक सचिन गुंड यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त आहे. पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहर उपाध्यक्ष व कैलास गिरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल अंबामाता मंदिर कात्रज व कैलास गिरी मोटर ड्रायव्हिंग स्कूल कात्रज रोड संचालक निलेश गिरी गोसावी यांच्या दोन्हीही प्रशिक्षण संस्थांना मानांकन प्राप्त झालेले आहे.
पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे शहर उपाध्यक्ष व जगदीश मोटार ड्रायव्हिंग स्कूल नरे आंबेगाव संचालक जगदीश मुळे यांच्या प्रशिक्षण संस्थेचा समावेश अ मानांकनात आहे.
पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल शहर उपाध्यक्ष व भरत मोटार ड्रायव्हिंग स्कूल दत्तनगर आंबेगाव संचालक भरत गायकवाड यांच्या प्रशिक्षण संस्थेला अमानांकन प्राप्त झाले आहे. पुणे शहर मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन शहर उपाध्यक्ष व वीरेंद्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल कुमार पार्क बिबवेवाडी संचालक वीरेंद्र आंबेठी यांच्या प्रशिक्षण संस्थेला अमानांकन प्राप्त आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख व स्वरा मोटर ड्रायव्हिंग स्कूल सासवड पुणे संचालक आशिष पवार यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ मानांकन प्राप्त आहे.
गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल खराडी पुणे व विमान नगर खराडी विभागाचे प्रमुख गणेश देवकर यांच्या प्रशिक्षण संस्थेला मानांकन प्राप्त झाले आहे.
पुणे शहर  मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन पुणे सोशल मीडिया विभाग प्रमुख व न्यू अक्षय मोटार ड्रायव्हिंग स्कूल सोमवार पेठ पुणे संचालक अक्षय काळे यांच्या प्रशिक्षण संस्थेला मानांकन प्राप्त आहे. न्यू प्रगती मोटर ड्रायव्हिंग स्कूल हडपसर व पुणे शहर हडपसर विभागाचे प्रमुख सुमित बाजारे यांच्या प्रशिक्षण संस्थेला मानांकन प्राप्त आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सभासद योगीराज मोटार ड्रायव्हिंग स्कूल के के मार्केट पुणे  संचालक निलेश बडदे यांच्या प्रशिक्षण संस्थेला अ  मानांकन प्राप्त झाले आहे. श्री मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक व मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य सन्माननीय सभासद श्री गायकवाड यांच्या प्रशिक्षण संस्थेला अमानांकन प्राप्त आहे . 
सदर प्रसंगी अ मानांकन प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले हा सन्मान पुणे शहरातील 36 ड्रायव्हिंग स्कूल संचालकांना सदर प्रसंगी सन्मानित करण्यात आले.  एकूण मानांकनाच्या 70 टक्के मानांकन मिळविण्यात मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे सदर प्रसंगी एकनाथ ढोले विठ्ठल मेहता अनंत कुंभार राजू घाटोळे संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व डॉ अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांचे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थितांना संबोधित केले कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाहिद जमादार वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक पुणे यांनी केले आभार प्रदर्शन रेशमा शेख सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुष्पक केवडकर अक्षय काळे गणेश देवकर भरत गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test