Type Here to Get Search Results !

माजी सैनिक नितीन शेंडकर यांच्या हस्ते प्रणाली शिक्षण संस्था-करंजे प्रांगणात ध्वजारोहण.

माजी सैनिक नितीन शेंडकर यांच्या हस्ते प्रणाली शिक्षण संस्था-करंजे प्रांगणात ध्वजारोहण.

सोमेश्वरनगर   - भारतीय प्रजासत्ताक   दिनानिमित्त  प्रणाली शिक्षण संस्था करंजे  येथील  प्रांगणात  माजी सैनिक नितीन शेंडकर संचालक विनोद गोलांडे  यांच्या  शुभ हस्ते   गुरुवार दि २६ रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आले.

भारतात 'प्रजासत्ताक  दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला  जातो.  २६  जानेवारी   २०२३ रोजी  प्रजासत्ताक    दिन   साजरा होतो  .दरवर्षी जानेवारा  महिन्याच्या   २६   तारखेला   भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो. आपला भारत १५ ऑगस्ट  १९४७  रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य   घटना  २६   जानेवारी १९५० रोजी अमलात आली  . २९   ऑगस्ट   १९४७  रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर   यांच्या   अध्यक्षतेखाली  स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापना केली   गेली.   म्हणून हा  दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.

    

यावेळी  करंजे  गावचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संतोष हुंबरे, बहुजन समाजसेवा संघ उपाध्यक्ष गणेश मदने  , प्रणाली शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष व करंजे माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे , संचालक विनोद गोलांडे ,दया संतोष हुंंबरे सह  ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

      याप्रसंगी संचालक विनोद गोलांडे यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुणे माजी सैनिक प्रणाली शिक्षण संस्था उपाध्यक्ष नितीन शेंडकर यांनी प्रजासत्ताक दिन विषय माहिती  सांगत उपस्थितांना ' प्रजासत्ताक दिनाच्या ' शुभेच्छा दिल्या व आभार संतोष हुंबरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test