बारामती ! महाराष्ट्र एज्युकेशन सोसा. हरिभाऊ गजानन देशपांडे इं. मि. स्कूल,बारामती.
पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बारामती - महाराष्ट्र एज्युकेशन/ सोसायटी हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शैक्ष णिक वर्ष २०२२-२३ चे पारितोषिक वितरण समारंभ व वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार,दि. १०/०१/२०२३ रोजी उत्साहात साजरे झाले. 'कृष्णलीला' हा स्नेह
संमेलनाचा विषय अतिशय रंजकतेने सादर करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रा. रविंद्र कोकरे (ग्रामीण कथाकार) लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. गोविंद कुलकर्णी सर यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी विशेष गुण संपन्न विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या,इंग्रजी माध्यमाची शाळा असून ही भारतीय संस्कृती, अध्यात्म व इतिहास जपणारी तसेच विद्यार्थ्यांवर संस्कार करणारी शाळा म्हणून शाळेचे कौतुक यावेळी उपस्थित विशेष अतिथींनी केले. मुख्य अतिथी मा.संजीव देशपांडे यांनी एम. ई. एस शी असलेल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले विचार व्यक्त केले. 'कृष्णलीला' म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा जीवन प्रवास वेगवेगळ्या प्रसंगां तून विद्यार्थ्यांनी अतिशसुंदरतेने सादर केला. कार्यक्र माचे प्रास्ताविक करताना शाळेच्या वर्षभरातील घडा मोडी,शाळेत राबविले जाणारे विविध उपक्रम, पंचको शाधारीत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा होणारा सर्वांगीण विकास तसेच विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश यावि षयी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास म . ए.सो. ग.भि. देशपांडे विद्यालयाचे मुख्या ध्यापक उमेद सय्यद सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसो बडदे ,पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनिता तावरे यांची उपस्थिती लाभली. शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. धनंजय खुर्जेकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच शाळेचे महामात्र डॉ.गोविंद कुलकर्णी वेळोवेळी मार्गदर्शन करत शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक विभाग प्रमुख अपर्णा इनामदार यांनीही यावेळी आपले मत व्य क्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची नाईक यांनी तसेच सांस्कृतिक विभाग उपप्रमुख अनुप्रिता कुदळे यांनी केले. विद्यार्थी प्रतिनिधी चि.प्रणव दळवी यांनेही यावेळी आपले मत व्यक्त केले.शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेमून दिलेली कामे सुरळीतपणे पार पडली .कार्यक्रमाची सांगता भगवद् गीतेच्या पंधराव्या अध्यायाने झाली.