Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठान मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा...

सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठान मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा... 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सी .बी .एस. ई. येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . 
             याप्रसंगी शाळेची माजी विद्यार्थिनी कु. सई सचिन भोसले हिच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. सई मागील वर्षी सीबीएसई बोर्डातून 99.20 % गुण मिळवून बारामतीतून प्रथम आली होती. शाळेतील मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळा दरवर्षी अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वज फडकवते . शाळेतील इयत्ता आठवी नववीतील विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुणे व ध्वजाला मानवंदना दिली . शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर लेझीम कवायत सादर केली . तसेच इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .
         यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन पाठक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका काकडे व शर्वरी महानवर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test