अरणेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये " रस्ता सुरक्षा अभियान" संपन्न.
प्रतिनिधी दिगंबर पडकर :
पुुणे - डॉ . अजित शिंदे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे. संजीव भोर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे. त्यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमाचे जनजागृती कार्यक्रम सोमवार दिनांक १६ जानेवारी २०२३ अरण्येश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सहकार नगर पुणे ९ येथे संपन्न झाला अरणेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी व विद्यालयाचा संपूर्ण शिक्षक वर्ग यांना रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्त्व वाहतुकीचे नियम याबाबत मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना वाहतुकीच्या नियमाचे माहिती पुस्तक सदर प्रसंगी वितरित करण्यात आले . शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतुकीची शपथ विजय सावंत वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक पुणे यांनी दिली.सदर कार्यक्रमाला विजय सावंत वरिष्ठ मोटर वाहन निरीक्षक पुणे रहिमा मुल्ला मोटार वाहन निरीक्षक पुणे. श्रद्धा कंदापुरे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे .सतीश माळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे.जयंतकाटे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे. रणजीत मगर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे. संस्थेच्या वतीने अरणेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रद्धा परांडे मुख्याध्यापिका व श्वेता कुडले मुख्याध्यापिका मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजू घाटोळे. कार्याध्यक्ष विलास आपटे सातारा रोड विभागाचे अध्यक्ष अनिल भिसे .पुणे शहर उपाध्यक्ष वीरेंद्र आंबेठी.टेक्निकल कमिटीचे विवेक माळवदे.सातारा रोड महिला विभाग अर्चना इरकल. राधा मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालिका रूपाली बोरकर. भिसे मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक सुनील भिसे. काळे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक किरण काळे. राधा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक संतोष बोरकर. डॉक्टर ड्राईव्ह मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक प्रतीक गवारे. अवधूत मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे संचालक अवधूत देवळे. आयुष मोटर ड्रायव्हिंग स्कूल धनकवडी चे संचालक विशाल बोबडे. स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सचिन गुं ड .भरत मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक भरत गायकवाड .संतोष कपटकर. बसंत कुमार भाटिया. लालू कदम. आदी मान्यवर उपस्थित होते सदर प्रसंगी रहिमा मुल्ला मोटर वाहन निरीक्षक पुणे. विजय सावंत मोटर वाहन निरीक्षक पुणे. श्रद्धा कंदापुरे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पुणे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रद्धा परांडे व मुख्याध्यापिका श्वेता कुडले या मान्यवरांचे मार्गदर्शन सदर प्रसंगी झाले मोटार वाहन विभागाचे चालक मंडलिक सुद्धा सदर प्रसंगी उपस्थित होते.