बारामती ! योद्धा स्पोर्ट्स क्लबच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार...
बारामती प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व गोवा या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय पिंच्याक सिलाट स्पर्धेत बारामतीच्या योद्धा स्पोर्ट्स क्लबच्या 26 मुलांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत सर्व मुलांनी अतिशय चांगली कामगिरी केली.या स्पर्धेला भारतातून आलेल्या 28 राज्यात आपल्या बारामतीचे नावं गाजवले.
राष्ट्रीय स्पर्धेतील सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सुवर्ण व्यापारी महासंघांचे उपध्यक्ष,सिद्धिविनायक फाउंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरचे उपाद्यक्ष जोजारे सराफ,जमीर इनामदार,रुई गावचे समाजसेवक चौधरी सर, डीवायएसपी रमेश वेठेकर, आनंदकर सर,अनिल दुबळे सर, व योद्धा स्पोर्ट्स क्लब चे संचालक साहेबराव ओहोळ इत्यादी उपस्थित होते...
यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना जोजारे यांनी खेळाडूंना सर्वप्रकारे मदत करण्याचे आश्वासन दिले व येणाऱ्या काळात बारामती मध्ये ऑलम्पिक लेवलचे खेळाडू योद्धा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून कसे घडवता येतील याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. तसेच खेळाडूंनी आपल्या बारामतीचे नावं सम्पूर्ण भारत देशात गाजवले त्याबद्दल सर्वाचे आभार मानले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विरोधीपक्ष नेते अजित पवार हें खेळासाठी अविरत काम करत असतात हें ही या ठिकाणी जोजारे यांनी आवर्जून नमूद केले.तसेच डीवायएसपी रमेश वेठेकर यांनी खेळाचा फायदा आपल्या जीवनात कसा करता येईल व मुलींनी आपले स्वरक्षण कसे केले पाहिजे. त्यासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच मुलांनी आपल्या शालेय जीवनात खेळाडू ऋति कशी जोपसावी यांचे उदाहरण देताना अखंड महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन पुढे चालावे 'परश्री मातेसमान' हा महाराजांच दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपले जीवन कसे जगावे हें सांगितले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष चौधरसर यांनी सर्वांचे आभार मानले व सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व योद्धा स्पोर्ट्स क्लब करत असलेल्या कार्याचा गौरव केला, आलेल्या सर्व मान्यवरांचे,पालकांचे व खेळाडूंचे आभार आनंदकर सर यांनी मानले