...ती मदत मिळाल्यास मुलगा वाचू शकतो.... "एक मदतीचा हात हवा"
प्रवीण दिलीप निगडे वय ३३ हा रा निंबुत यांची किडनी ट्रान्स्फर साठी आर्थिक मदत मिळणेबाबत मदतीचे नम्र आवाहन वडील .
दिलीप नारायण निगडे रा.निंबूत ता. बारामती जि. पुणे.यांनी केले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार माझा मुलगा प्रवीण दिलीप निगडे वय ३३ हा सद्या इलेक्ट्रिकल ची किरकोळ काम करून उदरनिर्वाह करत आहे.परिस्तिथी आधीच हलाकीची असल्याने व व्यवसाय पण मोठा नसल्यामुळे जेमतेम कुटुंबाचा
उदरनिर्वाह होतो. त्याच्यावर अवलंबून असणारे आई, वडील, बायको तसेच २ लहान मुली असा
परिवार आहे. काही दिवसापूर्वी अचानक झालेल्या त्रासामुळे डॉ. ना दाखवले असता काही टेस्ट केल्यानंतर कळाले कि त्याच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या आहेत. डॉ. म्हणण्यानुसार सध्या त्याच्यावर कोवाई मेडीकल सेंटर, कोईम्बतोर, तमिळनाडू येथे डॉ. विवेक पाठक यांच्याकडे उपचार चालू आहेत. त्याला किडनी ट्रान्सप्लांट ची गरज आहे व त्याची आईच त्याची डोनर असल्यामुळे फक्त शस्त्र क्रियेसाठी लागणारा खर्च १० लाख व मेडिकल व इतर ५ लाख एवढा होणारा असून मला
अपेक्षा आहे कि मला आपल्याकडून शक्य ती मदत मिळाल्यास माझा मुलगा वाचू शकतो तरी आपण
माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व एक हात मदतीचा या संकल्पनेतुन मदत करावी आपली असणारी आर्थिक मोठी अथवा छोटी मदत माझा मुलगा व कुटूंबासाठी अनमोल असणार आहे,, सहकार्य करावे व दिलेल्या नंबर वर किंव्हा स्कॅनर च्या साह्याने आपण आपली मदत आमच्यापर्यंत पोहोच करू शकता