Type Here to Get Search Results !

शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन

शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
 पुणे,मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार पुणे येथे २० व २१ जानेवारी आणि २३ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

 या प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा असलेले अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ, महापुरुषांचे चरित्र्य व लेखनसाहित्य, शासनाची अधिकृत इतर प्रकाशने १० टक्के सवलतीच्या दरात विक्री करण्यात येणार आहेत.

 नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनास भेट देऊन ग्रंथ खरेदी करण्याचे आवाहन मुद्रणालयाचे व्यवस्थापक स. ह. केदार यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test