Type Here to Get Search Results !

"कुलवंत वाणी समाज महिला मेळावा २०२३""महिला मेळावा २०२३-पुणे-उदघाटन प्रथम सत्र "

"कुलवंत वाणी समाज महिला मेळावा २०२३"

"महिला मेळावा२०२३-पुणे-उदघाटन प्रथम सत्र "

"महिलांचा करूया सन्मान...
समाज बनेल महान..!"
   

पुणे प्रतिनिधी                               
एकच ध्यास,समाजाचा विकास या विचाराने प्रेरित होऊन,कुलवंत वाणी समाज ट्रस्टच्या सर्व समन्वयक  द्वारा आयोजित..
"कुलवंत वाणी समाज महिला मेळावा 2023,पुणे"
महिला उद्योजक व्यवसाय प्रशिक्षण शिबीर


              हा सामाजिक कार्यक्रम,रविवार, दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 09:30 ते सायंकाळी 5:00 या वेळेत   मांगल्य मंगल कार्यालय,पुणे याठिकाणी सर्व महिलांच्या उदंड उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या आनंददायी व उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.
      उदघाटन सत्र,प्रथम(सकाळ सत्र),द्वितीय (दुपार) सत्र व मकरसंक्रांत विशेष सत्र, यापद्धतीने विविध सत्रात सदर महिला मेळावा पार पडला.

"महिला मेळावा-उदघाटन सत्र" यामधील विविध ठळक घडामोडी...
 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिथी मान्यवर म्हणून उपस्थित असणाऱ्या अनुभवयुक्त ज्येष्ठ समाजभगिनी श्रीमती सुमनताई प्रकाशशेठ सजगुरे(पुणे),सौ.सुनिताताई दिलीप गोलांडे(धनकवडी),सौ.मंगलताई सुरेश सिद्ध(उरुळीकांचन), सौ.सत्वशिला शेखर गोलांडे(दौंड),सौ.शालिनी राजेश आरे(अहमदनगर),डॉ.निलांबरी सुरेशचंद्र खुडे(पुणे) यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून सदर कार्यक्रमाची  सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर ज्येष्ठ महिला भगिनी यांचे श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

उपस्थित सर्व महिला भगिनी यांचे शब्दसुमानांनी स्वागत तसेच संपूर्ण उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन पुणे येथील समन्वयक श्री.रविंद्र सुभाष गोलांडे सर यांनी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जामखेड येथील समन्वयक श्री.प्रशांत राजेंद्र होळकर सर यांनी केले.त्यांनी कुलवंत वाणी समाज ट्रस्ट स्थापना,विविध उपक्रम योजना व कार्य तसेच महिला मेळावा कार्यक्रम रूपरेषा याविषयक माहिती प्रास्ताविकाच्या माध्यमातून दिली.

सर्व समन्वयक,कुलवंत वाणी समाज ट्रस्ट प्रकाशित "कुलवंत वाणी दिनदर्शिका 2023" याचे प्रकाशन उपस्थित ज्येष्ठ मान्यवर भगिनी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात करण्यात आले.

मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणारे डॉ.अमोलजी रमाकांत खडके,डॉ.कु.स्वप्नाली शहाजी गुजर,नर्स-कु.वृषाली करंजकर,कु.हर्षदा चोरगे(पुणे) यांचे स्वागत ट्रस्टच्या वतीने करून उदघाटन सत्राची सांगता करण्यात आली.
 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test