Type Here to Get Search Results !

सांगवी येथे राज्यस्तरीय वधुवर मेळावा संपन्न ; धनगर समाज बांधवांचा मोठा सहभाग

सांगवी येथे राज्यस्तरीय वधुवर मेळावा संपन्न ; धनगर समाज बांधवांचा मोठा सहभाग 
सांगवी येथील रामकृष्ण मंगळ कार्यालयात धनगर समाज बांधवांचा पंधरावा राज्यस्तरीय वधुवर परीचय मेळावा मोठ्या दिमाखात संपन्न झाला माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मौर्य प्रतिष्ठान नांदेड चे डाॅ. यशपाल भिंगे सर उपस्थित होते समाज बांधवांनी वधुवर मेळावे अनेक ठिकाणी न करता एकाच ठिकाणी एकत्रित पणे येऊन एकच भव्यदिव्य असा वधुवर मेळावा घ्यावा तसेच पालकांनी पोट जाती विसरून आपल्या मुलामुलींची लग्न करावीत असे मत मेळाव्याचे उद्घाटक आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी व्यक्त केले आमदार राम शिंदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले तर डॉ. यशपाल भिंगे यांनी उपस्थित धनगर समाज बांधवांना आपल्या व्याख्यानातून होळकर शाहीचा इतिहास उलगडून सांगितला व वधुवर मेळाव्यास मार्गदर्शन केले. याप्रसंगी रोहित पांढरे, श्रीधर गोरे,खंडू तांबडे, संतोष वाघमोडे यांनी बनवलेल्या सुभेदार मल्हारराव होळकरांच्या रणभूमीवरील अश्वारुढ तैलचित्रे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या परीचय मेळाव्यासाठी एक हजार पेक्षा जास्त वधुवरांनी आपली नावे नोंदवून सहभाग घेतला होता यावेळी मुंढवा वरीष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, उद्योजक तुकाराम काळे, धनगर सेवा संघ आळंदी चे अध्यक्ष जयवंत कवितके, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस रमेश भांड, पिंपरी चिंचवड चे विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे, युवा उद्योजक विवेक बिडगर, धनगर समाज उन्नती मंडळाचे अनिल अप्पा धायगुडे, महादेव वाघमोडे, अभिमन्यू उघडे साहेब, डॉ.उज्वला ताई हाके, मिनाताई थोरात,प्रा. सोमनाथ नजन,  आदि मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्याचे आयोजन धनगर समाज सेवा संघ पुणे यांच्या वतीने अध्यक्ष मुकुंद कुचेकर, कार्याध्यक्ष दिलीप काटकर, उपाध्यक्ष मच्छिंद्र पिसे, संचालक दर्शन गुंड, गणेश लंबाते विजय भोजणे, रमेश सावळकर, राजेंद्र कवितके, पांडुरंग उराडे, रोहिदास गोरे, अभिमन्यू गाडेकर, विठ्ठल कडू, भास्करराव गाडेकर, आदिंनी केले होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test