Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! सोमेश्वरच्या सभासदांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालु नये - पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वरनगर ! सोमेश्वरच्या सभासदांनी बाहेरील कारखान्यास ऊस घालु नये - पुरुषोत्तम जगताप 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील  श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामाकरीता कारखान्याने आज अखेर ७,०९,९२२ मे.टनाचे गाळप केले असुन सरासरी ११.०७ टक्के साखर उतारा राखीत ७,८३,८०० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. त्याचसोबत आपल्या कारखान्याच्या कोजन प्रकल्पामधुन आजअखेर ४,९१,५७,१९५ युनिट्सची वीजनिर्मिती केली असुन २,७४,४०,२४४ युनिट्सची वीजविक्री केलेली आहे.        त्याचप्रमाणे कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पातुन ४१,७३,७५३ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतले असुन सोबत १९,०१,८७२ लिटर्स इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे अशी माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन
पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. आपल्या कार्यक्षेत्रात गरजेइतकी मुबलक तोडणी वाहतुक यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे आपल्या नोंदवलेल्या संपुर्ण ऊसाचे वेळेत गाळप करण्यासाठी, संचालक मंडळ कटीबद्ध असुन सभासद शेतकर्यांनी बाहेरील
कारखान्यास ऊस घालु नये असे आवाहन श्री.जगताप यांनी केले आहे.आपला कारखाना दैनंदिन सरासरी ७६०० मे.टनाने गाळप करीत असुन गेल्या महिन्याभरापासुन आपण सरासरी ८५०० मे. टनाचे गाळप करत असल्याने आपला संपुर्ण नोंदवलेला ऊस माहे एप्रिल अखेर आपण गाळप करणार आहोत.जगताप पुढे म्हणाले की, आपल्या कारखान्याकडे सभासदांचे व बीगर
सभासदांचे एकुण ४०,७९२ एकर ऊसक्षेत्र नोंदविले असुन त्यापैकी १९,८४४ एकर आडसाली ऊसाचे क्षेत्र आहे. यातील दि. १९ जानेवारी अखेर ६,५६,८२८ मे.टन आडसाली ऊसाचे गाळप झालेले आहे. उर्वरीत आडसाली ऊसातुन १,९०,०००
मे.टन गाळप अपेक्षित असुन येत्या महिन्याभरात आडसाली संपविण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दहाव्या व आकराव्या महिन्यातील खोडवा ऊसाचे गाळप सुरु असुन दहाव्या महिन्यातील १०००१ व ८६०३२ या व्हरायटीस आपण तोडी देणार आहोत. अदयाप आपल्या कारखान्याकडे एकुण नोंदपैकी बेणे व इतर वजा जाता गाळपासाठी २२,६८३ एकर ऊसक्षेत्र शिल्लक आहे. या संपुर्ण नोंदलेल्या ऊसाचे आपण गाळप करणार आहोत. जगताप पुढे म्हणाले की, अत्तापर्यंत तुटलेल्या ऊसास पहिला हप्ता प्रति मे.टन २८०० रुपये प्रमाणे सभासदांच्या खात्यावर आपण वर्ग करीत असुन उच्चांकी दर देण्याची जी आपली परंपरा आहे याचा विचार करुन सभासदांनी
इतरत्र ऊस न देता आपल्या कारखान्यासच गाळप करावा. आपण जरी अत्ता २८०० रु. प्रमाणे ऊसबील सभासदांना देत असलो तरी अंतीम दराबाबत सोमेश्वर इतर कारखान्यांपेक्षा कमी असणार नाही.जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, आपल्या
कारखान्याची विस्तारवाढ पुर्ण झाली असुन आपण सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण करीत असुन त्याचसोबत आपल्या डिस्टीलरी प्रकल्पाची विस्तारवाढ प्रस्तावित आहे. या सर्वांसाठी स्वगुंतवणुक करणे गरजेचे असुन यसाठी आपण
वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घेत ऊस क्षेत्राच्या प्रमाणात एक एकर ऊस क्षेत्रासाठी एक भाग या प्रमाणात शेअर्स रक्कम कपात करीत आहोत. वास्तविक पाहता आपल्या पोटनियमानुसार १० गुंठे ऊसक्षेत्रासाठी १ भाग असा नियम
असतानाही आपण १ एकर ऊसक्षेत्राच्या प्रमाणात एका भागाची रक्कम कपात करीत असुन ही रक्कम कपात करीत असताना धोरनानुसार रोखीने अथवा ऊसबीलातुन किंवा विवीध कार्यकारी सोसायटीमार्फत मध्य मुंदतीचे कर्ज उपलब्ध
करुन ही रक्कम आपण माहे मे पर्यंत कपात करीत आहोत. भविष्याचा विचार करीता सर्वच कारखाने शेअर्सच्या प्रमाणात ऊस गाळपास आणण्याची शक्यता नाकारता येत नसुन ऊसक्षेत्राच्या प्रमाणात आपले शेअर्स असणे योग्य राहिल असेही .जगताप म्हणाले जगताप पुढे म्हणाले की, काही सभासद शेतकरी यांनी वाहनमालक व तोडणी कामगार ऊसतोडणीसाठी पैशाची मागणी करत असल्याचे कारखाना प्रशासनास कळविले असुन यानिमित्ताने सर्व शेतकरी सभासद बांधवांना मी आवाहन करतो की, जर वाहनमालक किंवा टोळी शेतकर्यांना पैसे मागुन नाहक त्रास देत असतील तर आपण आपली लेखी तक्रार कारखान्याकडे करावी याची शहनिशा करुन त्यांच्या बिलातुन पैसे वसुल करुन ते शेतकर्यांना परत दिले जातील. तरी शेतकर्यांनी ऊस जळीत करण्यास परवानगी देवु नये असेही.जगताप म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test