Type Here to Get Search Results !

अहमदनगर ! युनायटेड केनल क्लब इंडिया अंतर्गत अहमदनगर केनल क्लब आयोजित डॉग शो चे अहमदनगर येथे आयोजन

अहमदनगर ! युनायटेड केनल क्लब इंडिया अंतर्गत अहमदनगर केनल क्लब आयोजित डॉग शो चे अहमदनगर येथे  आयोजन
अहमदनगर- युनायटेड केनल क्लब इंडिया अंतर्गत अहमदनगर केनल क्लब आयोजित डॉग शो चे दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी गंगा उद्यान मागील मैदान अहमदनगर येथे  आयोजन करण्यात आले अशी माहिती अहमदनगर केनल क्लबचे अध्यक्ष श्री.रमेश शिंदे यांनी दिली.
अहमदनगर येथे अधिकृत असा पहिलाच डॉग शो असून आय लव्ह नगरच्या माध्यमातून उद्योजक श्री.नरेंद्र फिरोदिया, टच फाउंडेशन च्या माध्यमातून उद्योजक श्री.गौतम मुनोत,तसेच अनेक प्रायोजक या डॉग शो च्या यशस्वीतेसाठी पाठबळ देत आहेत अशी माहिती सचिव श्री.सचिन क्षीरसागर यांनी दिली.
अहमदनगर शहराची एक वेगळी ओळख प्रत्येक क्षेत्रात आहे.अहमदनगरचा डॉग शो दर्जेदार आणि उत्तम व्हावा यासाठी सर्व पदाधिकारी आणि सदस्य प्रयत्नशील असून नियोजन साठी विविध बैठक आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती श्री.हर्षद कटारिया यांनी दिली.
    
 डॉग शो यशस्वी होण्या साठी अहमदनगर शहर आणि तालुक्यातील डॉग ब्रीडर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ, डॉग लव्हर यांची विविध बैठकी पैकी एक बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीत प्रसिद्ध डॉग ब्रीडर,आणि परीक्षक श्री.अरुण  चौधरी यांनी उपस्थितांना डॉग शो संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना श्री.शशिकांत नजान म्हणाले की अहमदनगर जिल्हा विविध क्षेत्रात आघाडीवर आहे,अनेक क्षेत्रात नगरचे नावलौकिक आहे. शहरात आणि जिल्ह्यात श्वानप्रेमी नागरिक आहेत.आपल्या शहरात होणारा डॉग शो दर्जेदार होणार असून श्वानप्रेमी आणि ब्रीडर यांना या शो मधून निश्चित मार्गदर्शन होणार आहे.या शो मध्ये सातत्य असावे आणि दरवर्षी आयोजन व्हावे अशी नजान यांनी श्वानप्रेमी यांच्या वतीने अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सर्वश्री. अरविंद  सब्बन,रोहन सांगोळे,प्रवीण घावरी, सचिन लोखंडे,विनायक मंचे, आकाश कवडे,महेश आहेर,आशिष सातपुते,विश्वास खिलारी
हे उपस्थित होते युनायटेड केनल क्लब अंतर्गत अहमदनगर केनल क्लब आयोजित अहमदनगर चा डॉग शो यशस्वी करण्यासाठी श्री.भावेश परमार,श्री.संकेत साळुंके,प्रशांत बुऱ्हाडे,श्री.अक्षय दहातोंडे,श्री.दुर्गेश गाडेकर ,प्रा.प्रवीण कुटे सर,निखिल परदेशी परिश्रम घेत आहेत.

डॉग शो मध्ये सहभाग नोंदणी करण्यासाठी प्रवेश फी ९०० रुपये असून याच फी मध्ये सहभागी डॉगचे युकेसी चे रजिस्ट्रेशन करण्यात येईल. फ़ॉर्म मिळण्यासाठी

रोहन सांगोळे -८०८७८३४७४१,
भावेश परमार - ८०८७०००१८७,
हर्षद कटारिया- ९८८१३७७७७२,
दुर्गेश गाडेकर - ९२२६५८२७३६,
डॉ. अक्षय दहातोंडे - ७७२२०४०५०५
किंवा....
हॅपी पेटस, दिल्ली गेट, ऐंजल अँड डेमोन्स गुलमोहोर रोड, शिव फार्मा केडगाव, शारदा एजन्सी जुना बाजार , कटारिया पेट शॉप मल्हार चौक येथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test