भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
सोमेश्वरनगर - आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठीतील पहिले दर्पण हे नियतकालिक सुरु केले. त्यास स्मरण म्हणून महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन किंवा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त भारतीय पत्रकार संघ बारामती तालुक्याच्या वतीने सोमेश्वर- करंजे संपर्क कार्यलय याठिकाणी शुक्रवार दि.६ जानेवारी रोजी. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन अध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित पत्रकार बंधूंनी आजची पत्रकारिता कशी असावी या विषयावर मत व्यक्त करत पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, प्रसिद्धी प्रमुख सुशीलकुमार अडागळे, हल्ला कृती समिती निखिल नाटकर, कार्याध्यक्ष शंतनु साळवे, सदस्य अजय पिसाळ, शरद भगत, बाळासाहेब बालगुडे आदी पत्रकार बांधव उपस्थिती होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष काशिनाथ पिंगळे, सूत्रसंचालन उपाध्यक्ष विनोद गोलांडे यांनी तर आभार शंतनु साळवे यांनी मानले.