Type Here to Get Search Results !

"सोमेश्वर करंडक २०२३" चा मानकरी माळेगाव क्रिकेट क्लब.

"सोमेश्वर करंडक २०२३" चा मानकरी माळेगाव क्रिकेट क्लब.   
उपविजेता एस आर पी एफ दौंड पोलिस संघ,तृतीय क्रमांक उंडवडीचा क्रिकेट क्लब तर चतुर्थ क्रमांक जितूभैया सकुंडे क्रिकेट क्लब. 

सोमेश्वर-करंजे  : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाणता राजा  पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता ठरला तनवीर शेखचा माळेगाव क्रिकेट क्लब. बारामती तालुक्यातील या अग्रमानांकित स्पर्धेमध्ये वाई, फलटण, खंडाळा, पुरंदर, बारामती, दौंड, कोरेगाव, शिरूर या तालुक्यामधून आलेल्या क्रिकेट संघामधून झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये...बारामतीतील  "माळेगाव क्रिकेट क्लब" या संघाने बाजी मारली. ..उपविजेता संघ एस आर पी एफ दौंड या पोलिस संघाने दुसरा क्रमांक पटकावला. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला उंडवडीचा क्रिकेट क्लब, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही अतिशय करंजे येथील मगरवाडी नजीक गलांडे मैदान वर चुरशीच्या लढतीमध्ये पुणे आणि बारामती असे बलाढ्य संघ असताना सर्वांना धूळ चारत जितू भैया सकुंडे क्रिकेट क्लब सेमीफायनल मध्ये पोहोचला होता. या संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. प्रथम क्रमांकाचे बक्षीस व चषक नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक संग्राम सोरटे आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजेपुल पोलीस निरीक्षक  योगेश शेलार यांच्या हस्ते देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस व चषक युवानेते  गौतम भैया काकडे देशमुख यांच्या वतीने देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस उंडवडीच्या क्रिकेट क्लब ला शेंडकरवाडीचे उद्योजक भोसरी येथील रेणुका इंडस्ट्रिजचे मालक चांगदेव धुर्वे  यांच्या हस्ते देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस बारामतीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामार्फत स्वप्नील जगताप यांच्या वतीने देण्यात आले. या स्पर्धेसाठी परिसरातील बहुतेक व्यवसायिकांनी आपापल्या व्यावसायाच्या जाहिरातीचे बोर्ड संपूर्ण मैदानावर लावले होते. यावर्षी प्रथमच ही स्पर्धा युट्युब लाईव्ह वर दाखवण्यात आलेली होती. परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि सोमेश्वर पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन  पुरुषोत्तम जगताप, माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडेदेशमुख, पश्चिम महाराष्ट्राचे आरपीआयचे अध्यक्ष योगेश अहिवळे अशा विविध लोकांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती लावून साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 
ही स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तीने यशस्वी झाली. या स्पर्धेमुळे आपल्या परिसरातील क्रिकेटपटूंना एक व्यासपीठ निर्माण झाले असून भविष्यात या परिसरामधून  युवकवर्ग चांगले  क्रिकेटपटू तयार व्हावेत बारामती करंजे बरोबर तालुक्याचे नावं उचवावे असे आयोजकांनी बोलताना सांगितले तसेच सात तालुक्यामधून आलेल्या क्रिकेटपटूमुळे या परिसरातील व्यवसायिकांना नक्कीच फायदा होतो त्यामुळे पुढील काळामध्ये अनेक बदल करून ही स्पर्धा आधुनिक पद्धतीने भरवण्याचा प्रयत्न राहील.असेही बोलताना सांगितले "सोमेश्वर करंडक" हे नाव दोन जिल्ह्यांमध्ये अतिशय गाजलेले असून भावी काळात यापेक्षाही सुंदर नियोजन करण्याचा आयोजकांचा  प्रयत्न राहील. यावेळी ही स्पर्धा युट्युब माध्यमातून प्रदर्शित केल्यामुळे जगभरातील १९२ देशांमध्ये "सोमेश्वर करंडक" चा प्रसार झालेला आहे. असे या स्पर्धेचे आयोजक  बुवासाहेब हुंबरे यांनी सांगितले.
  स्पर्धेचा मानकरी ठरला तो दौंड पोलिस संघाचा किरण भगीरथ. उत्कृष्ट फलंदाज ठरला तो शिरष्णे संघाचा बारामतीचा हार्दिक पांड्या संतोष लष्कर. उत्कृष्ट गोलंदाज चा मानकरी ठरला माळेगावचा तन्वीर शेख. उडी मारुन झेल टिपून प्रेक्षकांची मने जिंकणारा चौधरवाडी चा गोरख चौधरी याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब मिळवला. यात पट्ट्याचा युट्युब वर झेल पाहून पुण्यातील व्यवसायिक मुकुंद चौधरी यांनी रोख बक्षीस पाठवले. 
या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन बुवासाहेब हुंबरे मित्र परिवार यांचेमार्फत युवकांचे नेतृत्व किरण शेंडकर, भाऊसाहेब हुंबरे,  पापा मुलांनी, राजेश भांडवलकर ,विनोद गोलांडे सह सहकारी मित्र परिवार यांनी अहोरात्र  मेहनत घेत ही स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test