'आरटीई'साठी शाळांची २५ टक्के राखीव आरटीई प्रवेशासाठीसोमवारपासून नोंदणी..
...या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन
मुंबई:- सर्व खासगी शाळांतील २५ टक्के मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याच्या आधारे सर्व खासगी
शाळांतील २५ टक्के राखीव आरटीई प्रवेशासाठी राज्यातील शाळांच्या नोंदणीला सोमवारपासून दिनांक २३ सुरुवात होणार आहे.त्यासाठी आज प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कार्यक्रम जारी
केल्याची माहिती संचालक शरद गोसावी यांनी दिली. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी
खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश करण्यासाठी यंदा अधिकाधिक शाळांची नोंदणी व्हावी, यासाठी
विभागाने हा कार्यक्रम आखला आहे; मात्र यंदा नव्याने सुरू झालेल्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये सुरुवातीची तीन वर्षे आरटीई प्रवेश राबवू नयेत, अशा सूचना विभागाने दिल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. आरटीई प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी
https://student.maharashtra.gov.in/
या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रिक्त जागांचा प्रश्न कायम मागील २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात आरटीई
प्रवेशासाठी राज्यात ४२ हजार शाळा असताना
त्यापैकी केवळ ९ हजार ८६ शाळांनीच नोंदणी केली होती. त्यामध्ये एक लाख १ हजार ९०६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ३४ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या.
कोणती कागदपत्रे...लागतील?
■ निवासी पुराव्यासाठी रेशनिंग कार्ड,
■ड्रायव्हिंग लायसन्स,
■वीज बिल,
■घरपट्टी,
■आधार कार्ड,
■मतदान ओळखपत्र,
■पासपोर्ट,
■बँक पासबुक आवश्यक.
■जन्मतारखेचा पुरावा,
■जात प्रमाणपत्र पुरावा
■उत्पन्नाचा दाखला,
दिव्यांगांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
सिंगल पॅरेंट कागदपत्रे