विहिरीत पाण्याचा हिस्सा आणि शेतातील रस्ताच्या कारणावरून करंजे येथे एकास मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मिळालेला माहितीनुसार
बारामतीतील वडगाव निंबाळकर पो स्टे गु.र.नं :- 18/2023 भादवी क 447,323,504,506 अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016चे कलम 92(ब)
--------
फिर्यादी :- चंद्रकांत नवनाथ होळकर वय 51 वर्षे, रा.होळ पाटील वाडा ता.बारामती जि.पुणे
----------
आरोपी :- लहु पोपट होळकर रा.करंजेता.बारामती जि.पुणे
--------
गुन्हा घडला ता वेळ - ता. 08/01/2023 रोजी सकळी 11.00 वा.चे.सु।।मौजे करंजे देऊळवाडी ता.बारामती जि.पुणे जमिन गट न. 27/1 मध्ये
--------
जखमी - फिर्यादी स्वत:
---------
हकीगत- वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा किशोर असे मौजे करंजे देउळवाडी गावचे हद्दीतील जमिन गट नं 27 मधील शेतात कल्टी वेटर मारत असताना यातील आरोपी मजकुर याने फिर्यादीचे शेतात अनाधिकृत पणे फिर्यादीचे संमतीशिवाय प्रवेश करुन फिर्यादीस तुमचे विहीरीचे काम चालु आहे त्यामध्ये पाण्याचा हिस्सा पाहीजे तसेच तुमचे गटाचे पुर्व बाजुस असलेले उत्तर दक्षिण बाजुस असलेला 12 फुट रस्ता लेखी कागदोपत्री दस्ताने करुन द्या असे म्हणत असताना फिर्यादी याने त्यास असे कसे होवु शकते गटात पुर्वीपार पासुन रस्ता आहे त्या रस्त्याने जाणे येणे करीता कोणीही अडथळा केला नाही व करणार नाही हा रस्ता आले नकाशामध्ये देखील आहे त्यामुळे मी रस्ता लिहुन देण्याचा प्रश्चन येत नाही असे म्हणालेचे कारणावरुन तसेच मी अपंग आहे हे माहीत असतानाही आरोपी मजकुर याने चिडुन जावुन फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी करुन फिर्यादीचा मुलगा किशोर यास हाताने लाथुबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीस शेततळ्यात ढकलुन देवुन आपखुशिने दुखापत केली
वगैरे मजकुरची करंजेपुल पोलीस दुरक्षेत्र ओपी खबर नं 12 /2023 येथुन फिर्याद आल्याने गुन्हा रजि.दाखल करण्यात आला असुन गुन्हाचा प्रथम वर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांचे कोर्टात रवाना केला असून पुढील तपास प्रभारी अधिकारी - सपोनि सचिन काळे वडगाव निंबाळकर मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश शेलार हे करीत आहेत.