सोमेश्वरनगर ! मु.सा. काकडे महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु . सा. काकडे महाविद्यालयात विश्व हिंदी दिवस संपन्न येथील मु.सा. काकडे महाविद्यालयामध्ये हिंदी विभाग द्वारा आयोजित विश्व हिंदी दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने हिंदी ही विश्व भाषा आहे आणि ती आणखी प्रसारित होण्यासाठी जनमताचा आदर करून जनमानसाची भाषा व्हावी. जनमानसाची भाषा होत असताना तिने प्रत्येक राज्याच्या मातृभाषेचाही सन्मान ठेवावा आणि हे करीत असताना विश्वस्तरावर संपर्क भाषेच्या रूपामध्ये हिंदीने पहिले स्थान ग्रहण करावे असे विचार हिंदी विभाग प्रमुख प्रा. अच्युत शिंदे यांनी मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा कल्याणी जगताप यांनी केले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या, मराठी विभाग प्रमुख प्रा.डाॅ. जया कदम, हिंदी विभागाचे पोपट जाधव सर, संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख प्रा. आदिनाथ लोंढे सर, मराठी विभागाच्या प्रा. देवकाते मॅडम आणि हिंदी विभागाचे व अन्य विषयाचे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.