Type Here to Get Search Results !

लोणी भापकर ! लोणी भापकर येथे रंगणार भव्य क्रिकेटचे सामने

लोणी भापकर ! लोणी भापकर येथे रंगणार भव्य क्रिकेटचे सामने 
मुढाळे प्रतिनिधी  (शंतनु साळवे) - बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त लोणी भापकर क्रिकेट क्लब आयोजित भव्य फुल पिच सामने  साहेब चषक २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. हे सामने रविवार दि. १५ जानेवारी पासुन ते १९ जानेवारी पर्यंत लोणीभापकर येथील जुनानाथ मंदिर पाठीमागे या ठिकाणी होणार आहेत.
    या सामन्यांमध्ये प्रथम पारितोषिक ५१ हजार, द्वितीय ३१ हजार, तृतीय २१ हजार व चतुर्थ पारितोषिक ११हजार असे असणार आहे. अशी माहिती आयोजकानी दिली. या स्पर्धेत अवश्य भाग घेण्याचे आवाहन लोणी भापकर क्रिकेट क्लब यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test