Type Here to Get Search Results !

माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी येथे चिमुकल्यांनी भरवला आठवडे बाजार.

माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी येथे चिमुकल्यांनी भरवला आठवडे बाजार.
सोमेश्वरनगर - शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना दैनंदिनी व्यवहाराची जाणीव आणि पैशांची आकडेमोड यावी या उद्देशाने 
माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाची वाडी(ता बारामती) येथे विद्यार्थ्यांसाठी आठवडा बाजार आणि खाऊ गल्ली या उपक्रमाचे आयोजन केले होते .

दैनंदिन जीवनातील व्यवहार ज्ञान समय सूचकता व हजर जबाबीपणा अशा विविध महत्त्वाच्या मूल्यांचा अंतर्भाव विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सहज समाविष्ट होण्यासाठी शाळेत आठवडे बाजार आणि खाऊ गल्लीचे तसेच भाजीपाला, कडधान्ये, खाऊ गल्ली असे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले,
विविध प्रकारची स्टॉल उभारणीपासून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या दुकानाची योग्य मांडणी तसेच व्यवहार कसा करावा आपल्या मूळ भांडवल व खर्चाचा ताळमेळ घालून फायदा तोटा असा लक्षात घेणे बाजारात होणाऱ्या काही फसवणुकीपासून सावध होणे आधी बाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  मंगळवार दि १७ रोजी आठवडा बाजाराचे उद्घाटन  उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तर या आठवडे बाजारात२५ ते २६  हजारांची उलाढाल होत माध्यमिक विद्यालय गडदरवाडी खंडोबाचीवाडी येथे आठवडे बाजार संपन्न झाला तसेच मुख्याध्यापक मोहन कोकरे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष बापुराव लकडे, सरपंच अजित लकडे, माजी सरपंच धनंजय गडदरे, मा.सरपंच अंकुश लकडे, उपसरपंच संतोष धायगुडे , ग्रामस्थ व सर्व शिक्षकांना सहकार्य केले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test