Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा शुभारंभ
पुणे : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा किल्ले रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शुभारंभ करण्यात आला. पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी ज्योत प्रज्वलित केल्यानंतर ऑलम्पियन खेळाडू श्री अजित लाकरा यांना सोपवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. 

यावेळी महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद महाड, शिवछत्रपती पुरस्कारार्थी संजय कडू,  आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा गायकवाड, राष्ट्रीय दिव्यांग खेळाडू सिद्धेश शिर्के मुख्य समन्वयक अमित गायकवाड, समन्वयक उदय पवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.
 

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या मुख्य क्रीडाज्योत रॅलीचा पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रागंणात गुरुवार ५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्यातील आठही जिल्ह्यातून आलेल्या क्रीडाज्योती पुण्यातील एसएसपीएमएस येथे रायगड येथील मुख्य ज्योतीत विलीन करण्यात येणार आहेत. ही क्रीडाज्योत लाल महाल-कसबा गणपती-दगडूशेठ गणपती-समाधान चौक-तुळशीबाग चौक-शगुन चौक-भानु विलास टॉकिज चौक- अल्का टॉकीज छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून गाडीने फर्ग्यूसन मार्गे पुणे विद्यापीठ चौक-बाणेर फाटा या मार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे दुपारी १ वाजता पोहोचणार आहे. 


या रॅलीत खेलरत्न पुरस्कारार्थी अंजली भागवत, पदमश्री पुरस्कारार्थी शितल महाजन, ध्यानचंद पुरस्कारार्थी स्मिता यादव (शिरोळे), ऑलिम्पियन खेळाडू मारुती आडकर, धनराज पिल्ले, अजित लाकरा, विक्रम पिल्ले बाळकृष्ण आकोटकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वपनिल कुसाळे, रुतुजा भोसले, श्रद्धा तळेकर, अर्जून पुरस्कारार्थी निखील कानिटकर, शंकुतला खटावकर, शांताराम जाधव, रेखा भिडे, गोपाळ देवांग, मनोज पिंगळे, काका पवार, राहूल आवारे, नंदन बाळ, संदीप किर्तने, नंदू नाटेकर, सुयश जाधव व मुरलीकांत पेटकर सहभागी होणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test