जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा शेंङकरवाङी वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न. झाला कार्यक्रमास शेंङकरवाङीतील ग्रामस्थ मंङळींनी बहुसंख्येने उपस्थित राहून शाळेतील विध्यार्थी यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.या सांस्कृतिक कार्यक्रमातील ङान्स सुरज शिंदे यांनी बसवले होते.लहान लहान मुलांनी मराठी व हिंदी पिक्चर मधील गाण्यावर व लावणी तसेच शिवचरित्रावर अधारित गाण्यावर ताल धरून नृत्य सादर केले.शिवचरित्रावर अधारित गाण्याला करंजेपूल गावचे सरपंच वैभव गायकवाड यांनी आपला घोडा उपलब्ध करून दिला होता.त्या बद्दल शाळेच्या वतीने शाल श्रिफळ देऊन शालेय शिक्षक सतिश पिसाळ यांनी त्यांना सन्मानित केले.ग्रामस्थांनी देणगी रूपात या कार्यक्रमास मदत केली.या कार्यक्रमास शालेय शिक्षक पिसाळ गुरूजी श्रीमती वाळा मॅङम अंगणवाङी सेविका रेश्मा शेंङकर व मदतनीस श्रीमती मिनाक्षी बङेकर यांचे सहकार्य लाभले.