"सुगरण" उपक्रमाद्वारे महिलांना मिळणार हक्काची बाजारपेठ
बारामती: महिला बचत गटाची चळवळ मोठया प्रमाणात उभी राहावी त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर व रिलायन्स स्मार्ट स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्विनी अभियान प्रकल्प अंतर्गत सुगरण महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे. बचत गटातील महिलांना सबल करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला महिला बचत गटांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुगरण उपक्रमामुळे महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे मत स्मार्ट स्टोअर उदघाटन प्रसंगी खा.सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
बारामती स्मार्ट रिलायन्स मॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन बारामतीच्या समन्वयक वनिता बनकर यांनी केले होते.
याप्रसंगी यशस्विनी अभियानाच्या जिल्हा समन्वयक वैशाली नागवडे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव,शहर युवती अध्यक्षा आरती शेंडगे तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, दिपाली पवार,लोचन शिवले, रोहिणी खरसे, राजश्री जगताप, रेश्मा ढोबळे, शामल जगताप, पिंपळी गाव सरपंच मंगल केसकर,बचतगट सी.आर.पी.अश्विनी बनसोडे,पूनम थोरात, कारंडे तसेच रिलायन्स स्मार्टचे मॅनेजर सुनिल क्षिरसागर आदींसह मान्यवर उपस्थित होते.
सुगरण या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व बचत गटातील उद्योजिका, जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनाची विक्री केंद्र यशवंतराव चव्हाण यशस्विनी अभियान व स्मार्ट रिलायन्स मॉलच्या आवारात सुरू करण्यात आले आहे.त्याचे उदघाटन खा. सुप्रिया सुळे यांचे हस्ते करण्यात आले. दर शनिवारी आणि रविवारी हे विक्री केंद्र मॉल बाहेर सुरू असणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खा.सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपाली पवार व मनीषा रासकर यांनी मोलाचे सहकार्य केले.