बारामती ! बांधकाम कामगारांच्या हस्ते झाले ध्वजारोहण..
बारामती प्रतिनिधी(दिगंबर पडकर) :
पुणे येथील श्रमिक हक्क आंदोलन या ट्रेड युनियन कडून कोथरूड आणि येरवडा भागातील नाका बांधकाम कामगार आणि नागरीकांसाठी ७४ वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात गाणी, वैचारिक संवाद,लहान मुलांसाठी नृत्य व बौद्धिक खेळ इ.चे आयोजन करण्यात आले होते.
येरवडा वस्ती युनियन उपाध्यक्ष जगदीश राठोड, अकबर खान, आखलक खान,कांतू चव्हाण, पूजा चव्हाण व पुष्पावती सोनार या बांधकाम कामगार समीतीच्या हस्ते झाले ध्वजारोहण झाले.ज्या कामगारांना कधीच कोणी माणूस म्हणून वागणूक दिली नाही त्यांना आज झेंडावंदन करण्याचा मान श्रमिक हक्क आंदोलन युनियन ने दिला. त्यामुळे बांधकाम कामगारांच्या आयुष्यात युनियनचे महत्व खूप जास्त आहे.असे कामगारांच्या मनोगतातून व्यक्त झाले.
आज बांधकाम कामगार आपल्या संविधानीक हक्कांसाठी लढायला सज्ज झाले आहेत. याचे श्रेय बांधकाम कामगार हे श्रमिक हक्क आंदोलन या ट्रेंड युनियनलाच देतात. बांधकाम कामगारांनी संघटित होऊन खऱ्या अर्थाने प्रजेची संविधानीक सत्ता आणण्यास प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन संघटनेचे चिटणीस मकरंद पवार आणि सरचिटणीस सागर सविता धनराज यांनी केले.कोथरूड आणि येरवडा परिसरात प्रथमच बांधकाम कामगारांसाठी अशा प्रकारे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आल्याने बांधकाम कामगार आणि नागरिकांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.