Type Here to Get Search Results !

'करंजेपुल' च्या आठवडे बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट...लवकरच चोरटे जेलबंद असणार - API सचिन काळे

'करंजेपुल' च्या आठवडे बाजारात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट...लवकरच चोरटे जेलबंद असणार -API सचिन काळे
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मध्ये  करंजेपुल येथे दर मंगळवारी आठवडी बाजारात  असतो या बाजरातून मोबाईल चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. तर १५ ,२०,२५ अश्या  किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे सहा ते सात मोबाईल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी दि २४ रोजी घडली आहे.  या  अगोदर ही अश्या चोरीच्या घटना या बाजारातून घडल्या असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे... विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे अंकित करंजेपुल क्षेत्र आहे. लवकारात लवकर मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सध्या सोमेश्वर साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू आहे विविध जिल्हातून ऊसतोड मजूर येथे दाखल झाले आहे  यामुळे आठवडे बाजारात मोठी गर्दीची ही संख्या वाढलेली आहे या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरटे संधीचा फायदा घेत आहेत.. बाजारात भाजीपाला खरेदी करताना किंवा पैसे देतानाची संधी साधुन चोरटे मोबाईल लंपास करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड आणि त्रास सहन करावा लागतोय. यापूर्वीही अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. या बाबत पोलिसांत तक्रार देखील दिलेल्या आहे.

या बाजारात आजुबाजुच्या गावातील शेतकरी भाजीपाला, कृषी उत्पादने विक्रीसाठी आणतात. ताजी आणि चांगला भाजीपाला माफक दरात मिळतो म्हणून शेजारील गावातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात आणि आपला मोबाईल फोन हरवून बसतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्तातला भाजीपाला खरेदीच्या नादात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. पोलिसांनी या अठवडी बाजारातील मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

आठ फाटा येथील  दूध व्यवसायिक मधुकर रामनाथ काची यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल २५ हजार रुपये किमतीचा करंजेपूल आठवडे बाजारातून चोरीला गेला असल्याने ते हळहळ व्यक्त करत आहे.

लवकरच मोबाईल चोरट्यांना जेलबंद करणार तसेच यापुढे अशा घटना सोमेश्वरनगर परिसरात घडणार नाही. 
वडगाव निंबाळकर पोलीस सहायक निरीक्षक - सचिन काळे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test