जगताप यांनी वाढदिवसानिमित्त उत्कर्ष आश्रमशाळेतील मुलांना दिले मिष्ठान्न भोजन.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील चोपडज येथील रूपीचंद किसन जगताप रा. चोपडज, ता. बारामती, यांचे वाढदिवसानिमित्त उत्कर्ष आश्रमशाळेतील मुलांना मिष्ठान्न भोजन वाघळवाडी (ता बारामती) येथील उत्कर्ष आश्रमशाळा वाघळवाडी येथे गुरूवार दि. १२ जानेवारी २०२३ रोजी चोपडज येथील युवक रूपीचंद किसनराव जगताप यांनी आपल्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील इयत्ता १ ली ते १२ वी मधील निवासी अनाथ व निराधार मुलां-मुलींना मिष्ठान्न भोजन देवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. आजकाल समाजातील अनेक व्यक्ती आपल्या मुलांचा नातवाचा स्वतः आपला वाढदिवस मोठया धूम-धडाक्यात गाजावाजा करत साजरा करण्यात व्यस्त असतात व मोठा खर्च व्यर्थ करत असतात परंतू चोपडज(ता.बारामती) येथील शेतकरी कुटूंब किसन ढगुराव जगताप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी बेबी किसनराव जगताप यांनी आपला मुलगा रूपीचंद किसनराव जगताप यांचा ३४ वा वाढदिवस
वाघळवाडी येथील उत्कर्ष प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील मुलां-मुलींसमवेत साजरा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. किसनराव जगताप यांचे कुटूंबीयांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील मुलांना
मिष्ठान्न भोजन देवून मुलांच्या निरागस चेहऱ्यावर हास्य फुलविले तसेच आश्रमशाळेसाठी आवश्यक ती वस्तू रूपामध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य हनुमंतराव सावंत, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या
प्राचार्या रोहिणी हनुमंतराव सावंत यांनी किसन जगताप कुटुंबीयांचे आभार मानले. कार्यक्रमास ढगुराव रामभाऊ जगताप (आजोबा), काजलताई रूपीचंद जगताप (पत्नी), कु. समृध्दी, सृष्टी, श्रेया व तायाप्पा जाधव तसेच रूपीचंद जगताप यांचे सर्व नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार उपशिक्षक किरण चाबुकस्वार यांनी केले.