Type Here to Get Search Results !

पुरंदर ! वाल्हेत बाल स्पर्धकांचा सन्मान सोहळा उत्साहात

पुरंदर ! वाल्हेत बाल स्पर्धकांचा सन्मान सोहळा उत्साहात
 
पुरंदर तालुक्यातील वाल्हे नगरीत श्री संत शिरोमणी सावतामाळी तरुण मंडळाकडून राजमाता जिजाऊ तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या बौद्धिक खेळाच्या स्पर्धेत सुयश मिळविणाऱ्या बाल स्पर्धकांचा सन्मान सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
यावेळी येथील श्री संत सावतामाळी मंदिरासमोर मकर संक्रातीच्या दिवशी तिळगुळाच्या वाटपाने या कार्यक्रमास सुरवात करण्यात आली.यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह बौद्धिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या .या दरम्यान  मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बाल स्पर्धकांना सन्मानपत्र व भेटवस्तू देण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमासाठी सचिन लंबाते राहुल यादव प्रदीप चव्हाण यांसह रोहित भोसले किरण कुमठेकर अमर भोसले संतोष गायकवाड तसेच श्री संत शिरोमणी सावतामाळी तरुण मंडळाचे दीपक भुजबळ संदीप भुजबळ अतुल गायकवाड सुदाम भुजबळ पांडुरंग भुजबळ गणेश भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर भुजबळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत भुजबळ यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test