आट्या-पाट्या स्पर्धेत मिळवले तिहेरी यश,
स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगांव निंबाळकर प्रशालेचे यश.
बारामती: स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगांव निंबाळकर प्रशालेने जिल्हास्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेत मिळवले तिहेरी यश. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे, अंतर्गत आयोजित जिल्हास्तर आट्या-पाट्या स्पर्धा, जिल्हा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी पार पडल्या. सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत १७ वर्षे वयोगट मुलींचा संघ,१९ वर्षे वयोगट मुलांचा संघ, १९ वर्षे वयोगटातील मुलींचा संघ, अशा तीनही संघांची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली असून, प्रशालेने जिल्ह्यामध्ये या खेळामध्ये आपला नावलौकिक निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत असून, संबंधित खेळाडूंना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.निलेश दरेकर सर व सौ.देशमुखे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
हा खेळ ग्रामीण भागातील पारंपरिक खेळ सुरपाट्या या खेळाशी संलग्न असून या खेळात वेग,दिशाभिमुखता,समन्वय, निर्णय क्षमता, शरीराचा तोल सांभाळणे अशा कौशल्यांना विशेष महत्त्व आहे. 2019 पासून शासकीय शालेय खेळ प्रकारात याचा समावेश करण्यात आला आहे.