Type Here to Get Search Results !

इंदापूर ! पत्रकारांनी समाजातील खरी वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडली पाहिजे - उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे

इंदापूर ! पत्रकारांनी समाजातील खरी वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडली पाहिजे - उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे
इंदापूर - पत्रकारांकडून समाजाची मोठी अपेक्षा असते. त्यामुळे पत्रकारांनी समाजातील खरी वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडली पाहिजे व समाजानेही पत्रकारांचं स्वातंत्र्य जपले पाहिजे व त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे असे प्रतिपादन बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले.
   पत्रकार दिनानिमित्त, तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,देशातील पहीली क्रांतीकारी विद्यार्थीनी मुक्ता साळवे, आचार्य बाळशास्री जांभेकर, देशातील पहीली मुस्लिम शिक्षिका फातीमा शेख,राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांचे संयुक्त जयंतीचे औचीत्य साधुन राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळा, समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्याचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी इंगळे बोलत होते.
       इंदापूर येथील राधीका रेसिडेन्सी हाॅलमध्ये आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी इंदापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर धनवे, सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील,जय इन्स्टिट्युटचे जयंत नायकुडे,माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,कृष्णाजी ताटे, सुवर्णयुग पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन पोपट पवार,समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष युवराज मस्के, नगरपरिषद गटनेते कैलास कदम,भिमशक्ती तालुकाध्यक्ष युवराज पोळ, आरपीआय इंदापूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे,अॅड.समीर टीळेकर,अॅड.नितीन राजगुरू, ललेंद्र शिंदे, दत्ता जगताप,संजय शिंदे, तानाजी धोत्रे, रमेश शिंदे,गफुरभाई सय्यद, राजेंद्र भाडळे,शुभम पवार,गौरव राऊत, दत्तात्रय ठोंबरे, प्रशांत सिताप,रविंद्र म्हेत्रे,हमीद आतार,लक्ष्मण गुणवरे,सधीर मखरे यांचेसह मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधाकर बोराटे,प्रकाश आरडे,समीर सय्यद,शिवाजी पवार,दत्तात्रय मिसाळ,करण बोराटे,संतोष फुले यांनी परिश्रम घेतले.प्रस्ताविक प्रकाश आरडे यांनी तर सुत्रसंचलन संतोष नरूटे यांनी तर आभार सुधाकर बोराटे यांनी मानले.
-
विशेष पुरस्काराने सन्मानित..
       यावेळी सकाळचे निमगाव केतकी बातमीदार मनोहर चांदणे, पत्रकार भरत मल्लाव, संतोष ननवरे, नितीन चितळकर, बाळासाहेब कवळे,गजानन टिंगरे यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील व जयंत नायकुडे यांनाही पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले. तर विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या सावित्री जिजाऊच्या 15 लेकींना सावित्रीबाई फुले पुरस्काराने, कोरोना काळात रूग्णांची सेवा करणार्‍या 18 जणांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test